बल्लाळेश्वर तलाव हा प्राचीन तलाव असून पनवेल शहरात 30 एकरवर पसरलेला आहे या तलावाला वडाळे तलाव असेही म्हटले जाते .या तलावाच्या किनारीच बल्लाळेश्वर व रामेश्वर ही दोन मंदिरे आहेत . येथे भाविकांची वर्दळ असते . शांतवातावरणात बसण्यासाठी अनेक जण या मंदिरांत येतात .असे म्हटले जाते कि हे मंदीर पेशव्यांच्या काळातले आहेत आणि हे मंदीर आजहि अस्तित्वात आहेत.
या तलावात अनेक प्रकारच्या पाणवनस्पती आहेत. आणि पूर्ण तलावात जलपर्णी वनस्पती पसरलेली आहे जणू हिरवी शाल पसरलेली आहे तसेच सुंदर प्रकारची कमळे सुद्धा येतात पण या तलावात आता घाणीचे साम्राज्य पसरलेल आहे फुलांची हार ,प्लास्टिक पिशव्या आणि वर्षानु वर्षे साचून राहिलेला गाळ जमा झाला आहे तसेच हा तलाव दिवसेदिवस कमी होत चालला आहे. आता या तलावाचे अस्तित्व धोक्यात आहे हि एक वाईट बातमी आहे .
या तलावातील आणखी खास आणि मन खुश करणारी गोष्ट म्हणजे तलावात दिसणाऱ्या पाणकोंबड्या या कोंबड्या तलावात तीन ते चार च्या संख्येत हमखास दिसतात आपल्या पिल्लासोबत अन्नाच्या शोधात तुरुतुरु धावताना पाहायला मिळतात
या तलावात गाय बगळे, छोटे बगळे ,सारस पक्षी तसेच इतर झाडावर मैना ,चिमण्या ,रोबिन ,तुरेवाला बुलबुल तसेच इतर चिमण्या बघायला मिळतात
तुम्ही सुद्धा या तलावाला भेट देऊ शकता पनवेल जवळ महामार्गावर नवीन पनवेलला जाण्यासाठी उड्डाणपूल आहे त्याच्या विरुद्ध दिशेला एक रस्ता जातो वीस पंचवीस पावले गेल्यानंतर आपणास या तलावाचे दर्शन होईल आशा करतो कि आपण या तलावाला नक्की भेट द्याल .
तसेच मी काही मी काढलेले काही छायाचित्र देत आहे आपणास हे आवडतीलच .
मला तुमची प्रतिक्रिया जरूर पाठवा . . . . . ..धन्यवाद . . .आभारी आहे. . . . . .
''हितेश खरगावकर निसर्ग आणि वन्यजीवप्रेमी ''













